मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारतीय संघ आज आपला ७वा सामना खेळत आहे. हा सामना श्रीलंकेविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर सेमीफायनलमधील त्यांचे स्थान पक्के होईळ. मात्र श्रीलंकेने हा सामना गमावल्यास ते या शर्यतीतून बाहेर पडतील.
१२ वर्षांपूर्वी मुंबईच्या याच मैदानावर खिताब जिंकत एक अब्ज लोकांना एप्रिलमध्ये दिवाळी साजरी करण्याची संधी देणारा भारतीय संघ याच मैदानावर पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध लीग सामना खेळत आहे. २०११च्या विश्वचषकात फायनलमध्ये दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे होते मात्र आता तसे नाहीये. तिसऱा खिताब मिळवण्याच्या दिशेने टीम इंडियाची वाटचाल सुरू आहे तर श्रीलंका सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाण्याच्या स्थितीत आहे.
वनडेत भारत वि श्रीलंका
एकूण सामने १६७
भारत विजयी – ९८
श्रीलंका विजयी – ५७
बरोबरी – १
वर्ल्डकपमध्ये भारत वि श्रीलंका
एकूण सामने ९
भारत विजयी – ४
श्रीलंक विजयी – ४
अनिर्णीत – १