Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

10th-12th Exam : दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर!

10th-12th Exam : दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर!

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा (10th-12th Exam) जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.

इयत्ता दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ व इयत्ता बारावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक २ नोव्हेंबर २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त जाहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे.

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनदेखील महाराष्ट्र शिक्षण मंडळाने केले आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या संभाव्य वेळापत्रकावर मंडळाने हरकती आणि सूचना मागवली होती. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर या वेळापत्रकाला अंतिम स्वरुप दिले जात आहे.

Comments
Add Comment