Tuesday, August 12, 2025

Bollywood : 'पिप्पा'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Bollywood : 'पिप्पा'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

प्रियांशू पैन्युली, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर दिसणार सोबत


मुंबई : प्रियांशु पैन्युली, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांचा परफॉर्मन्स असलेला " पिप्पा” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Bollywood) प्रियांशु पैन्युली हा एक अष्टपैलू अभिनेता आहे जो "चार्ली चोप्रा आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" आणि "भावेश जोशी" मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो आता इशान खट्टर आणि मृणाल ठाकूर सोबत "पिप्पा" मध्ये काम करणार आहे असून आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by prime video IN (@primevideoin)





युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आधारित चित्रपट असून हा चित्रपट तीन भावंडांची कहाणी मांडतो. ज्यामध्ये इशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत प्रियांशू पैन्युली मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये तीन प्रमुख कलाकारांमधील केमिस्ट्रीची झलक दिसते. प्रियांशु पैन्युलीचा मनोरंजन उद्योगातील प्रवास हा कायम उल्लेखनीय ठरला आहे. या वर्षी "U-turn" आणि "चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली" मधील त्याच्या कामगिरीने त्याला मोठ्या प्रमाणावर कौतुक मिळालं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >