Tuesday, July 9, 2024
HomeदेशLPG Price Hike: ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा जोरदार झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात...

LPG Price Hike: ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा जोरदार झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात १०३ रूपयांची वाढ

नवी दिल्ली: देशात सणासुदीच्या काळात लोकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आज देशात सर्वत्र करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. तसेच आजपासूनच एलपीजी सिलेंडरच्या(LPG gas cylinder) दरात १०० रूपयांहून अधिक वाढ झाली आहे.

व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम खाण्या-पिण्याची इंडस्ट्री तसेच रेस्टॉरंट व्यवसायावर पाहायला मिळू शकतो. यामुळे बाहेरचे खाणे-पिणे मात्र महाग होणार आहे. जाणून घ्या ऑईल मार्केटिंग कंपननी एलपीजी सिलेंडरचे दर किती वाढवले.

दिल्लीत व्यवसायिक सिलेंडरच्या दरात १०१.५ रूपयांची वाढ

आज एक नोव्हेंबरपासून दिल्लीत व्यवसायिक एलपीजी सिलेंडरचे दर वाढन १८३३ रूपये प्रति सिलेंडर झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात हे दर १७३१.५० रूपये होते. दिल्लीत व्यवसायिक एलपीजीचे दर १०१.५० रूपयांनी वाढले आहेत.

जाणून घ्या आपल्या शहारातील दर

कोलकातामध्ये व्यवसायिक सिलेंडरचे दर १०३.५० रूपयांनी वाढले आहेत आणि आता हे दर १९४३ रूपयांवर पोहोचले आहेत. तर गेल्या महिन्यात याचा दर १८३९.५० रूपये होते.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर १७८५.५० रूपये आहेत आणि हे दर १०१.५० रूपयांनी वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये याचा दर १६८४ इतका होता.

चेन्नईत गॅस सिलेंडरचे दर १९९९.५० रूपयांवर आले आहेत. हे दर १०१.५० रूपयांनी वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये हे दर १८९८ रूपये होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -