Friday, July 19, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023PAK vs BAN: पाकिस्तानला विश्वचषकात अखेर मिळाला विजय

PAK vs BAN: पाकिस्तानला विश्वचषकात अखेर मिळाला विजय

कोलकाता: एकदिवसीय विश्वचषकात(world cup 2023) पाकिस्तानने(pakistan) बांगलादेशला(bangladesh) स्वस्तात हरवले. शाकिब अल हसनच्या नेतृत्वात बांगलादेशच्या संघाला ७ विकेटनी पराभव सहन करावा लागला. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत आहेत. बांगलादेशविरुद्ध विजयानंतर बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.

पाकिस्तानच्या आशा कायम

पाकिस्तानसमोर विजयासाठी २०५ धावांचे आव्हान होते. पाकिस्तानने ३२.३ षटकांत ३ विकेट गमावताना हे आव्हान पूर्ण केले. पाकिस्तानसाठी सलामीवीर अब्दुल्लाह शफीक आणि फखर जमां यांनी शानदार खेळी केली. अब्दुल्लाह शफीक आणि फखर जमा यांच्यात पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी झाली. अब्दुल्लाह शफीकने ६९ बॉलमध्ये ६८ धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीदरम्यान ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर फखर जमांने ७४ बॉलमध्ये ८१ धावा ठोकल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ७ षटकार ठोकले.

बांगलादेशसाठी एकमेव गोलंदाज मेहंदी हसन मिराज खेळला. मेहंदी हसन मिराजने ९ षटकांत ६० धावा देत ३ खेळाडूंना बाद केला. याशिवाय तास्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, मुस्ताफिजुर रेहमान, शाकिब अल हसन आणि नजमुल हौसेन शंटोला कोणतेच यश मिळाले नाही.

पाकिस्तानच्या विजयानंतर ते पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. पाकिस्तानने ७ सामन्यांमध्ये ६ गुण मिळवले आहेत. त्यांना आणखी ३ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -