Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीAPY Scheme: आता म्हातारपणाचे टेन्शन नाही, रोज ७ रूपये करा जमा या...

APY Scheme: आता म्हातारपणाचे टेन्शन नाही, रोज ७ रूपये करा जमा या सरकारी योजनेत

मुंबई: म्हातारपणी पेन्शनचा मोठा हातभार असतो. मात्र ही मदत तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल. अनेकदा लोक आपल्या म्हातारपणाबाबत तितकेसे गंभीर नसतात. खासकरून गुंतवणुकीबाबत. मात्र या चुकीमुळे लोकांना अनेकदा म्हातारपणी पश्चाताप कराावा लागतो. जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा गरजेच्या वस्तूंसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.

जर तुम्ही तरूण आहात तर तुम्ही दर महिन्याला एक छोटीसी रक्कम जमा करून तुमच्या म्हातारपणीचा आर्थिक खर्च सांभाळू शकता. यानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चितपणे एक रक्कम पेन्शन म्हणून मिळत राहील. यामुळे तुमच्या दैनंदिन गरजेसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

जर तुम्हाला म्हातारपणाची आर्थिक गरज मिटवायची असेल तर तुम्ही अटल पेन्शन योजना घेऊ शकता. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे. यात गॅरंटेड रिटर्न मिळतात. तुम्ही गुंतवणुकीच्या हिशेबाने दर महिन्याला १००० रूपयांपासून ते ५००० रूपयांपर्यंतची पेन्शन मिळवू शकता.

इतकंच नव्हे तर या पेन्शन योजनेमुळे पती-पत्नी दोघेही १० हजार रूपये प्रती महिना पेन्शनही घेऊ शकतात. भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर तुमचे वय ४० आहे तर लगेचच या योजनेंतर्गत खाते खोलून घ्या. कारण वयाच्या ४०नंतर तुम्ही यात खाते खोलू शकत नाहीत.

वयोमर्यादा – अटल पेन्शन योजना सुरू करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे इतकी आहे. यात पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी २० वर्षे गुंतवणूक करावी लागेल. ६०व्या वर्षापासून तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळू शकते.

किती मिळणार पेन्शन – जर तुमचे वय १८ वर्षे आहे तर योजनेत तुम्ही दर महिन्याला २१० रूपये म्हणजेच रोज ७ रूपये गुंतवून महिन्याला ५००० रूपयांची पेन्शन मिळवू शकता. जर तुम्हाला १००० रूपयांची पेन्शन हवी असेल तर यासाठी वयाच्या १८व्या वर्षापासून केवळ दर महिन्याला ४२ रूपये जमा करावे लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -