भाईंदर : मीरा रोड येथिल क्वीन्स पार्क भागात कौटुंबिक वादातून वीस वर्षीय पुतण्याने आपल्या काकीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली असून पोलीसांनी एकाला अटक केली आहे.
मीरा रोड येथिल क्वीन्स पार्क भागातील क्वीन्स एव्हेन्यू इमारतीत शबाना खान या आपल्या दहा वर्षीय मुलासह असताना समोरच्याच इमारतीत राहणारा त्यांचा पुतण्या दिशान खान (२०) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात घुसला शबाना यांचा मुलगा बाथरूम मध्ये जाऊन लपला असताना निषाद याने धारदार शस्त्राने शबाना यांच्यावर वार केले.
जखमी अवस्थेत शबाना यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयाने नवघर पोलीसांना माहिती दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश माने पाटिल यांनी दिशान खान (२०) याला अटक केली आहे.