Saturday, June 21, 2025

Maratha Andolan : विंचूर येथे कडकडीत बंद; भुजबळांसह राजकीय नेत्यांचे बॅनर हटवले

Maratha Andolan : विंचूर येथे कडकडीत बंद; भुजबळांसह राजकीय नेत्यांचे बॅनर हटवले

कांदा मार्केट बंद असल्याने व्यवहार ठप्प


विंचूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) हे उपोषणाला बसलेले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे विंचूर लासलगाव ४६ गाव बंदची (Vinchur banda) हाक देण्यात आली. तसेच परिसरातून या बंदमध्ये सहभागी व्हावे व कोणी आपल्या आस्थापना चालू ठेवू नये असे आवाहन करण्यात आले. विंचूर शहरांमध्ये लावलेले राजकीय नेत्यांचे बॅनर काढून टाकावे असेही आवाहन सकल मराठा समाजतर्फे करण्यात आले होते.


मराठा समाजाच्या आवाहनानुसार, विंचूर शहरातील प्रभू श्रीराम चौक येथील नवीन झालेल्या बस स्टॉप वरील आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा फोटो असलेला बॅनर काढून टाकण्यात आला. या बंदला सर्व विंचूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १००% कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विंचूर परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.


विंचूर उपबाजार समिती बंद असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच लासलगाव बस आगारातून आज सकाळपासून एकही बस बाहेर सोडण्यात आली नाही. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या- जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचे चित्र महामार्गावर होते.

Comments
Add Comment