Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीLalit Patil Drugs case : ड्रगमाफिया ललित पाटीलचा ताबा आता पुणे पोलिसांकडे

Lalit Patil Drugs case : ड्रगमाफिया ललित पाटीलचा ताबा आता पुणे पोलिसांकडे

ललितला मात्र पुणे पोलिसांची भीती; केले गंभीर आरोप

पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) फरार झाल्यानंतर साधारण दोन आठवडे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर साकीनाका पोलिसांच्या कारवाईला यश आलं आणि ललितला चेन्नईमधून अटक करण्यात आली. त्यानंतर मात्र या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यासंबंधी अधिक चौकशी करण्यासाठी तो फरार झाल्यापासून त्याच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांना (Pune Police) त्याचा ताबा हवा होता. अखेर न्यायालयाने परवानगी दिली असून ललित पाटील आता पुणे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

पुणे पोलीस लवकरच ललित पाटीलचा ताबा घेणार आहेत. ललित पाटीलसह शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. पुणे पोलिसांचा तपास हा ललित पाटीलच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरु आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं होते.

तर दुसरीकडे ललित पाटीलने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.”मला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. पुणे पोलिसांच्या मारहाणीमुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली आहे,” असं तो कोर्टात म्हणाला होता. तरी देखील न्यायालयाने त्याचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे.

अनेक गोष्टी येणार समोर

ललितला अटक झाल्यानंतर ससून रुग्णालयातून मी पळालो नसून मला पळवण्यात आलं होतं, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर तो अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिकहून इंदोरला, तिथून सूरत आणि पुन्हा नाशिक, धुळे, औरंगाबाद करत त्याने कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. त्यामुळे या सगळ्या प्रवासात त्याला कोणाची साथ मिळाली होती? तो पळून जाण्यात इतका यशस्वी कसा झाला? असे प्रश्न उपस्थित झाले होते. अनेक राजकारण्यांचेही संबंध या प्रकरणाशी जोडण्यात आले. त्यातच आता पुणे पोलिसांच्या ललित तावडीत सापडल्याने आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -