Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : मालमत्तेचं नुकसान, जाळपोळ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करा

Devendra Fadnavis : मालमत्तेचं नुकसान, जाळपोळ करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलक (Maratha Andolak) प्रचंड आक्रमक झाले असून राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करणारे अनुचित प्रकार ते करत आहेत. बीडमध्ये (Beed) तर आमदाराच्या घरासोबत नगरपरिषदही जाळण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्येही (Chhatrapti Sambhajinagar) भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. शिवाय राज्यात इतरही अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. हे वातावरण राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला हानिकारक असल्याचे लक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मालमत्तेचं नुकसान करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठा आंदोलन राज्यात हिंसक वळण घेत आहे, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठक घेतली. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. रात्री १० ते ११ अशी एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली.

मनोज जरांगेंचा हिंसेला विरोध

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कुठल्याही प्रकारची हिंसा न करण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही मराठा आंदोलकांनी अशा प्रकारे राज्यभरात जाळपोळ सुरु केली आहे. मराठा आंदोलकांनी हिंसक होऊ नये, काहीही झालं तरी आपण शांततेच्या मार्गानेच हे आरक्षण मिळवू, असं आवाहन जरांगेंकडून करण्यात आलं आहे. तरीदेखील आजही राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळीचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे फडणवीसांनीही हिंसा करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हे मराठा आंदोलक नव्हे तर समाजकंटक

दरम्यान, अशा प्रकारे हिंसक वागणारे हे मराठा आंदोलक असूच शकत नाहीत. हे कोणत्या तरी समाजकंटकांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली केलेलं कृत्य आहे, असं काही मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. घर जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिसांच्या विविध तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -