Monday, October 27, 2025
Happy Diwali

दिल्ली दारू घोटाळा, ईडीकडून केजरीवाल यांना नोटीस

दिल्ली दारू घोटाळा, ईडीकडून केजरीवाल यांना नोटीस

नवी दिल्ली: दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात(liquor scam) आता अंमलबजावणी संचलनालयाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने मुख्यमंत्री केजरीवालांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी मुख्यमंत्र्यांना सीबीआयने एप्रिल महिन्यात चौकशीसाठी बोलावले होते.

हे समन्स त्याच वेळेला आलेत जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांची जामीन याचिका फेटाळून लावली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना मोठा झटका देताना तपास विभागाने ३३८ कोटी रूपयांचा व्यवहार अस्थायीपणाने केल्याचे म्हटले आहे.

खोटी केस बनवत आहे केंद्र सरकार - आप

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करण्यात आले की आम आदमी पक्ष संपुष्टात आणणे हा केंद्र सरकारचा हेतू आहे. केंद्र सरकारला खोटी केस बनवून केजरीवाला तुरूंगात टाकायचे आहे.

त्यांना केजरीवालांना अटक करायची आहे - सौरभ भारद्वाज

सीएम केजरीवाल यांना मिळालेल्या समन्सवर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की केंद्र सरकारच्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपला आम आदमी पक्ष संपवायचा आहे.

Comments
Add Comment