सातपूर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण तातडीने द्यावे, या मागणीसह जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सातपूर विभागातून सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी मेणबत्ती फेरी काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिला पुरुषांसह सर्वपक्षीय राजकीय व सर्व धर्मीय बांधव यांनी हजेरी लावली होती.
सायंकाळी सातच्या सुमारास सावरकरनगर येथील जाणता राजा मैदान पासून सुरु झालेली रॅली मौले हॉल, आनंद छाया, सातपूर कॉलनी,समता नगर, सातपूर राजवाडा मार्गे सातपूर गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप करण्यात आला.
यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचाही निषेध करण्यात आला. मेणबत्या पेटवून सातपूर येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आल्या. यावेळी हजारो मराठा समाजबांधव उपस्थित होते.
उद्यापासून साखळी उपोcaषण
दरम्यान ,बुधवारी सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असून समाज बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.