अंकिता वालावलकरच्या एका कृतीवर नेटकरी संतापले…
मुंबई : अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) ही सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted girl) म्हणून प्रसिद्ध आहे. तिला प्रचंड फॅन फॉलोविंग (Fan follwing) देखील आहे. ती नेहमी मालवणी भाषेत, गावरान ढंगात रील्स पोस्ट करत असते. तिचा कंटेंट लोकांना खूप आवडतो. तिच्या रील्सना (Reels) हजारो, लाखोंच्या घरात व्हूज, कमेंट्स (Views, Coments) असतात. मात्र, हीच कोकणकन्या तिच्या एका रीलमुळे प्रचंड ट्रोल होत आहे. त्या रीलवर नेटकरी संतापले असून आजपर्यंत उचलून धरलेल्या अंकिताला त्यांनी थेट जमिनीवर आदळलं आहे.
अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) एक रील पोस्ट केली होती. यात ती म्हणते, की मी एक दुकान चालू केलं आहे आणि ते सांभाळण्यासाठी मी एका मुलीच्या शोधात होते. माझ्या मित्राला मी याविषयी कळवलं, तर त्याच्या ओळखीतून एका मुलीने माझ्याशी संपर्क साधला. जॉब प्रोफाईल काय आहे, असं तिने मला विचारलं. मी तिला तिचं शिक्षण विचारलं तर ती पदवीधर होती. तिचे छंद विचारले तर गाणी ऐकणे, गार्डनिंग हे जे आपण कॉलेजमध्ये असताना टिपिकल बायोडाटामध्ये लिहितो ते तिने मला सांगितलं. मी तिला सांगितलं की, तुला दुकान सांभाळावं लागेल, सकाळी एकदा झाडू मारावी लागेल आणि देवपूजा करावी लागेल, त्यावर ती मला हे नाही जमणार असं म्हणाली.
पुढे अंकिता म्हणते, त्यांना काय फक्त काखेत पर्स लावून कॉम्प्युटसमोर बसून तो चालवायचा असतो, म्हणजे त्यांना काहीतरी मोठं असल्यासारखं वाटतं. सगळ्यांना जॉब पोस्ट ऐकायची सवय झाली आहे. म्हणजे हेच झाडू मारणं वगैरे मी इंग्रजीत सांगितलं असतं तर त्यांना मोठ्या ऑफिसात गेल्यासारखं वाटलं असतं, असं अंकिता या रीलमध्ये बोलताना दिसते.
View this post on Instagram
अंकिताच्या या रीलवर नेटकरी प्रचंड संतापले आहेत. घंट्याची कोकणकन्या..कोकण रिफायनरी विरुद्ध आंदोलनात तर कुठेच दिसली नाही, प्रसिद्धीची नशा डोक्यात गेली, कोकण हार्टेड गर्ल हे तिने स्वत:च स्वत:ला दिलेलं नाव आहे, ही दुसरी राखी सावंत आहे, हिला कोणी पदवी दिली ‘कोकण हार्ट गर्ल’?, स्वयंघोषित कोकण हार्टेड आहे ही! आपला भूतकाळ मिरवणारी काकू आहे ही, अंकिताला देवबाग बाहेर कोणी कुत्रं ओळखत नाही, रिफायनरी काकू, मनसे हार्टेड गर्ल, आपल्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द खरा आहे असं तिला वाटू लागलं आहे, अंकिताचं मार्केट पडलं, असं म्हणत नेटकऱ्यांनी अंकिताला चांगलच ट्रोल केलं आहे.
दहा हजारांची नोकरी असणार्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये : अंकिता
चाहत्यांनी केलेल्या संतप्त प्रतिक्रियांपैकी एका प्रतिक्रियेला उत्तर देत अंकिताने “दहा हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये, झाडू मारण्यात कसला आलाय सेल्फ रिस्पेक्ट”, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे तर नेटकरी अधिकच भडकले आणि त्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. राज साहेबांनी हातात झाडू दिला असता तर मारला असता का? असा संतप्त सवाल एका नेटकर्याने विचारला आहे. तर आपण किती कमावतो यावर आपला सेल्फ रिस्पेक्ट ठरतो का? दहा हजारात जॉब करणाऱ्या मुलींना सेल्फ रिस्पेक्ट नसतो हे सांगणारी तू कोण? अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला.
काय ते तुम्हाला लवकरच कळेल : अंकिता
दरम्यान, आणखी एका कमेंटला उत्तर देत अंकिताने सर्वांना चकित केलं आहे. ती म्हणते, तुम्हाला जर हा प्रसंग खरा वाटला असेल तर तुमचे आभार. पण मुलींच्या अपेक्षा, एखादं काम करण्याचा कमीपणा या गोष्टी लक्षात घेऊन ही केवळ एक रील बनवली आहे. अशी कोणतीही मुलगी अस्तित्त्वात नाही. झाडू मारल्याने स्वाभिमान कमी होत नाही, हे यातून सांगायचं होतं. आणखी एक गोष्ट, माझं हे म्हणणं लक्षात ठेवा, तुम्हाला लवकरच काय ते कळेल, असं अंकिताने या कमेंटमध्ये म्हटलं आहे. असं असलं तरी नेटकर्यांनी मात्र रील बघून अंकिताला ट्रोल करणार्या कमेंट्सचा वर्षाव सुरुच ठेवला आहे.