पुणे: वर्ल्डकप २०२३मध्ये आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात टक्कर होत आहे. हा सामना पुणच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या वनडे सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडला आहे.
या मैदानावर आतापर्यंत ८ वनडे सामने खेळवण्यात आले. त्यात आठ वेळा ३००हून अधिक धावसंख्या बनली आहे. या मैदानावर खूप षटकारही ठोकण्यात आले आहेत. बेन स्टोक्ससारख्या फलंदाजाने येथील ४ सामन्यांत १६ षटकार ठोरले. गोलंदाजीत येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप ५मध्ये वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
कशी असणार पिच?
हे मैदान मोठी धावसंख्या उभारता येईल असे आहे. येथे फलंदाज धावांचा पाऊस बरसवू शकतात. येथे विकेट घेण्यासाठी वेगवान गोलंदाज जरी पुढे असले तर आज पिच स्पिनर्सना मदत करू शकते. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत. येथे टॉसची भूमिका तितकीशी महत्त्वाची नाही. कारण गेल्या ८ सामन्यात मैदानावर पहिल्यांदा आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी ४-४ सामने जिंकले आहेत.
अफगाणिस्तान-श्रीलंकेची स्थिती?
दोन्ही संघांनी या विश्वचषकात ५-५ सामने खेळले आहेत. त्यातील प्रत्येकी दोन सामने जिंकत सेमीफायनलमधील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. श्रीलंकेने या सामन्यातील पहिले तीन सामने गमावल्यानंतर गेल्या दोन सामन्यात नेदरलँड्स आणि इंग्लंडला मात दिली. तर अफगाणिस्तानने या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानला धूळ चारली.