नाशिक (प्रतिनिधी) – अंतरवेल सराटी येथील मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ
मराठा आरक्षणासाठी नाशिकला गेल्या ४८ दिवसापासून नाशिकला मराठा साखळी उपोषण अखंडित सुरू आहे,याच ठिकाणी नाना बच्छाव आमरण उपोषणात बसले आहे,त्या उपोषण स्थळापासून बाल वारकरी,मराठा बंधू भगिनी,युवक मुलांच्या उपस्थितीत ( दि ३०) मशाल रैली काढण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी हा मशाल मार्श मराठा समाजाच्या वेदनेचा हुंकार आहे,मराठा समाजाचे पिढीला शिक्षण रोजगारात ४० वर्षे आरक्षण दिलं नाही,मात्र आज ही जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात त्यांची खालावलेली स्थिती बघता मराठा टोकाचा संतप्त आहे,याबद्दल संतप्त मराठयाचा हा मशाल मोर्चा नाशिकच्या शिवपुतल्यालाजवळून निघाला,छत्रपती शिवरायांना उपोषण कर्ते नाना बच्छाव राम खुर्दळ यांचे हस्ते हार घालून मशाल मोर्चाचे प्रारंभ झाला.
त्यानंतर उपोषण कर्त्याना शाल देऊन नाना बच्छाव यांचे हातून मशाल पेटवून मशाल लॉंग मार्च सुरू झाला,शिवपुतला- सीबीएस सिग्नल,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड, मेंनरोड मार्गे हा मशाल मार्श टाळ मृदुनगच्या गजरात,हातात मराठा आरक्षणाचे फलक घेऊन तसेच घोषणा देत हा मशाल मार्श मध्ये मोठ्या संख्येने नाशिक व जिल्ह्यातील मराठा बांधव,महिला,युवक उपस्थित होते.
यावेळी नाना बच्छाव,राम खुर्दळ,चंद्रकांत बच्छाव,नितीन डांगे पाटील,शरद लभडे सचिन पाटील,योगेश कापसे,पवन पवार,राजेंद्र घडवजे,शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मूल, विकी गायधनी,योगेश कापसे,स्वातीताई कदम,रोहिणी उखाडे,ऍड शीतल भोसले,विजय चव्हाळ, बापू चव्हाण,राज भामरे,सुनील निरर्गुडे,,नितीन रोटे पाटील,राजू देसले,शिवाजी शेलार,गजानन लकडे,चेतन शेलार,सचिन कदम,संजय साबळे,संतोष शिंदे,राजेंद्र वाघ, बालाजी मालोडे,संतोष पेलमहाले,संदीप बरे,राम निकम,यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह हजारो मराठा बंधू भगिनी उपस्थित होत्या.