शेवगाव (प्रतिनिधी) – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर चालू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. चार दिवस उलटून गेले तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयाकडून कुठलेही लेखी स्वरूपात पत्र न दिल्याने आमरण उपोषणास बसलेल्या भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे व साखळी उपोषणात सहभागी असलेले कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भगवान आढाव, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, शेतकरी बचावचे एकनाथ काळे यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडून चार दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र न दिल्याने विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा व उपोषणास बसलेल्यांना वैद्यकीय मदत द्या अशा घोषणा देत.
या घटनेचा निषेध करत सकल मराठा समाजाच्या वतीने भातकुडगाव फाटा चौफुल्यावर तब्बल दोन तास रस्ता रोको करून निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल गुरव यांनी मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जाऊन या कामे कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. व यापुढील भातकुडगाव आरोग्य केंद्राला आपण लगेच लेखी दिले. असल्याची माहिती आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाला दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.
रस्ता रोको वेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे, शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, शिक्षक बँकेचे काकासाहेब घुले, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, तुकाराम शिंगटे, भाजपाचे विलासराव फाटके अविनाश महाराज लोखंडे यावेळी सकल मराठा समाजातील अनेक मान्यवरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. आदींनी आपल्या भाषणातून शासनाचा निषेध केला.यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.