मुंबई: वर्ल्डकप २०२३मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला हरवले. या वर्ल्डकपमध्ये भारताचा हा सहावा विजय आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि सर्वच सामने जिंकले आहेत.
भारताच्या वर्ल्डकपमधील सहाव्या सामन्यात गजविजेता इंग्लंडही भारताचा विजयीरथ रोखू शकला नाही. या विजयासह टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. इतकंच नव्हे तर वर्ल्डकपच्या इतिहासात एक नवा रेकॉर्डही आपल्या नावे केला आङे.
टीम इंडिया या सामन्यात इंग्लंडला हरवल्यानंतर वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा संघ ठरला आहे. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत वर्ल्डकपमधील ५९ सामने जिंकले आहेत. या बाबतीत आता भारतापेक्षा पुढे एकच संघ आहे.
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने कोणी जिंकले
आतापर्यंत झालेल्या सर्व वर्ल्डकपमच्या सामन्यांना मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण ७३ वर्ल्डकप सामने आपल्या नावे केले. हे जगातील सर्वाधिक सामने आहेत. या यादीत आता दुसरे नाव भारताचे आहे. त्यांनी ५९ सामने जिंकले आहेत. भारतानंतर तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे त्यांनी आतापर्यंत ५८ सामने जिंकले आहत.
याशिवाय भारताविरुद्ध वर्ल्डकप सामना हरल्यानंतर इंग्लंडच्या संघानेही नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आङे. इंग्लंडच्या क्रिकेट टीमने वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा सलग चौथा सामना गमावला आहे. याआधी वर्ल्डकपमधील सामन्यात असे कधीच घडले नव्हते.
गतविजेत्या इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टातच आले आहे. त्यांचे तीन सामने उऱले आहेत. जे अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत.