मॉस्को: इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. इस्त्रायल सातत्याने गाझामध्ये कारवाई करत आहे. यातच रविवार दक्षिण रशियाचे क्षेत्र दागेस्तानच्या मखाचकाला शहरात एअरपोर्टवर पॅलेस्टाईनचे समर्थनक अचानकपणे रनवेवर पोहोचले.
या दरम्यान, आंदोलन करणाऱ्या लोकांनी रनववे बंद केला. यामुळे रशिया विमान प्राधिकरण रोसावियात्सियाने दागेस्तान क्षेत्रातून माखचकाला येथे जाणाऱ्या सर्व विमानांना दुसऱ्या एअरपोर्टकडे वळवले.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, गाझामध्ये इस्त्रायल करत असलेल्या कारवाईचा विरोधा करण्यासाठी हे लोक एकत्र जमले होते. आंदोलकांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात आंदोलनकर्त्यांचा एक मोठा समूह एअर टर्मिनलमध्यये प्रवेश करत तसेच तेथील कॅमेरे तोडताना दिसत ाहे.
आंदोलनकर्त्यांनी एअरपोर्टच्या बिल्डिंगवर धाव घेतली, पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या.
आंदोलनकर्त्यांना व्हिडिओ आला समोर
समोर आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की आंदोलनकर्ते जबरदस्तीने दरवाजा ोलत आहे. कॅमेऱ्याच्या मागे माणसे अभद्र भाषेत ओरडत आहेत आणि दरवाजे खोलण्यास सांगत आहे. या दरम्यान एअरपोर्टचे कर्मचारी त्यांच्यावर भडकतात. तेथील एक महिला रशियन भाषेत सांगते की येथे कोणीही इस्त्रायली नाही.