विजयनगरम: आंध्र प्रदेशच्या(andhra pradesh) विजयनगरमजवळ एका पॅसेंजर रेल्वे रूळावरून घसरली. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार विजयनगरम जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेची धडक दुसऱ्या रेल्वेला बसली. या अपघातात रेल्वेचे ३ डबे रूळावरून घसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथावलासा अलमांदा-कंटाकापल्लीमध्ये विशाखा येथून रायगढा येथे जाणारी रेल्वे रूळावरून घसरली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.
Andhra Pradesh | A passenger train which was going to Rayagada from Visakhapatnam derailed in Vizianagaram district. More details awaited: Divisional Railway Manager
(Pictures taken by locals shared with ANI) pic.twitter.com/ZcynNnoJye
— ANI (@ANI) October 29, 2023
मुख्यमंत्र्यांनी दिले अॅम्ब्युलन्स पाठवण्याचे आदेश
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम वायएस जगनमोहन रेड्डी यांनी तात्काळ उपाययोजनेसाठी आणि विजयनगरम जिल्ह्याच्या जवळील जिल्हा विशाखापट्टणम आणि अनाकापल्ली येथून अधिकाधिका अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच चांगल्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
रेल्वे प्रबंधक मंडळाने सांगितले, मदत आणि अॅम्ब्युलन्ससाठी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला सूचना देण्यात आल्या आहेत. या रेल्वे अपघाताबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
भुवनेश्वर – 0674-2301625, 2301525, 2303069, वाल्टेयर- 0891- 2885914.