Sunday, May 25, 2025

देशमहत्वाची बातमी

PM Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी आज करणार मन की बात, या गोष्टींवर होणार चर्चा

PM Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी आज करणार मन की बात, या गोष्टींवर होणार चर्चा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat) च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज २७ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात १०६वा एपिसोड प्रसारित केला जाईल. या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि दिवाळीच्या सणाबाबत खास चर्चा करू शकतात. गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ पासून ते जी-२०च्या यशापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर आपले विचार मांडतील. हा मासिक रेडिओ कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन, AIR अॅपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय पंतप्रधान कार्यालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल्सवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईआल.



गेल्या एपिसोडमध्ये काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी


गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३चे लँडिंग पासून ते जी़-२०च्या यशस्वी आयोजनावर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले होते की मला पुन्हा एकदा भारत देश आणि देशातील नागरिकांचे यश साजरे करण्याची संधी मिळत आहे. सगळ्यात जास्त अभिनंदाचे मेसेज मला चांद्रयान ३ चे लँडिंग आणि दिल्लीतील जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल मिळाले.

Comments
Add Comment