सार्वजनिक वाचनालयाने काढले पत्रक
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारा नियोजित कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी येणाऱ्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नियोजित कार्यक्रम सकल मराठा समाजाचे मराठा उपोषणकर्ते नाना बच्छाव व सहकाऱ्यांनी आवाहन केल्याने पुढे ढकलला आहे,असे सार्वजनिक वाचनालयाने काढलेल्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
आज सोशल मीडियावर सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यास कार्यक्षम पुरस्काराने मंगळवारी गौरवणार असा मेसेज होता,हा मेसेज बघताच नाशिकला गेल्या ४५ दिवसापासून अखंडित उपोषणात बसलेले उपोषणकर्ते नाना बच्छाव व सहकाऱ्यांनी बघितला व सार्वजनिक वाचनालयाचे संचालक संजय करंजकर,सोमनाथ मुठाळ यांना फोन करून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यात कोट्यवधी गावानी सहभाग घेतला असून गाव खेड्यात शहरात मंत्री नेत्यांना बंदी असतांना आपण मंत्र्याला का बोलवले असा सवाल केला,मराठा समाजाच्या उद्विग्न भावना बघता आपण मंत्र्याला थांबवा असा इशारा दिला होता त्यांचा शब्द पाळत नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव डॉ धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने पत्रक काढून संबंधित कार्यक्रम पुढे ढकलला असे पत्रक सकल मराठा समाज उपोषण कर्त्याना कळवले आहे.