Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीKaali peeli Padmini Taxi : काळ्या-पिवळ्या पद्मिनी टॅक्सीचा प्रवाशांना निरोप; आज मुंबईतील...

Kaali peeli Padmini Taxi : काळ्या-पिवळ्या पद्मिनी टॅक्सीचा प्रवाशांना निरोप; आज मुंबईतील शेवटचा दिवस…

काली पीलीला लागणार कायमचा ब्रेक

मुंबई : मुंबईची (Mumbai) ओळख असणार्‍या अनेक गोष्टी नवनवीन सोयीसुविधांमुळे विरत चालल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रसिद्ध डबलडेकरने (Double decker) प्रवाशांचा निरोप घेतला. शेवटची डबलडेकर रस्त्यावरुन धावत असताना चालक आणि कंडक्टरसोबत प्रवासीही भावूक झाले होते. मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे चाळसंस्कृतीदेखील (Chawl) विरण्याच्या मार्गावर आहे. अनेक चाळींची जागा मोठमोठ्या इमारतींनी घेतली आहे. त्यातच आता आणखी एक गोष्ट मुंबईकरांचा निरोप घेणार आहे. ती म्हणजे पन्नास दशकांहून अधिक काळ मुंबईच्या रस्त्यांवरुन फिरणारी काळी पिवळी ‘पद्मिनी टॅक्सी’ (Kaali peeli Padmini Taxi).

आज शेवटची काली पीली पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरुन धावणार आहे. मात्र, उद्यापासून या टॅक्सीला कायमचा ब्रेक लागेल. नवे मॉडेल्स आणि अॅपमुळे ही काळी-पिवळी टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना दिसणार आहेत.

पद्मिनी टॅक्सीची सुरूवात १९६४ साली झाली होती. या टॅक्सीचे उत्पादन २००१ साली बंद करण्यात आले. परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २००३ रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झालेली टॅक्सी ही शेवटची ‘प्रीमियर पद्मिनी’ होती. ही शेवटची टॅक्सी खरेदी करणारे मालक अब्दुल करीब कारसेकर म्हणाले, ‘ही टॅक्सी म्हणजे मुंबईची शान आहे’. परंतु या टॅक्सीला आता मुंबईकरांना कायमचा निरोप द्यावा लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -