Monday, July 15, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023IND vs ENG : २० वर्षांनी भारताने इंग्लंडला हरवले, मारला विजयी षटकार,...

IND vs ENG : २० वर्षांनी भारताने इंग्लंडला हरवले, मारला विजयी षटकार, शमी-बुमराहसमोर इंग्रज सेना ढेपाळली

लखनऊ: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गतविजेत्या इंग्लंड संघाला कमी धावसंख्या असतानाही १०० धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या स्लो पिचवर २२९ धावा केल्या होत्या. याचे प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांवर कोसळला आणि भारताने १०० धावांनी विजय मिळवला.

भारताच्या विजयाचे हिरो ठरले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. या दोघांनी कमी धावसंख्येच्या सामन्यात इंग्लंडची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. शमीने चार विकेट मिळवल्या. तर बुमराहने तीन इंग्लंडच्या फलंदाजांना आपली शिकार बनवली.

भारताने टॉस हरल्याने पहिल्यांदा फलंदाजी मिळाली होती. या सामन्यात भारताने पहिले तीन फलंदाज स्वस्तात परतले. मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरत भारताला २२९ ही धावसंख्या गाठून दिली. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावा केल्या. के एल राहुलने ३९ धावा केल्या.

यानंतर २३० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात डळमळीत झाली. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संपूर्ण डाव १२९ धावांवर कोसळला. संघासाठी सर्वाधिक धावा २७ लियाम लिव्हिंगस्टोनने केल्या.

भारत सेमीफायनलमध्ये

या सामन्यातील विजयासह भारताने ६ सामने जिंकत १२ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे तसेच सेमीफायनलही गाठली आहे. दुसरीकडे इंग्लंडला ६ पैकी ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने ते या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -