Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजAstittva Natak : भरत जाधवचे वास्तववादी ‘अस्तित्व’

Astittva Natak : भरत जाधवचे वास्तववादी ‘अस्तित्व’

  • ऐकलंत का! : दीपक परब

नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून त्यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव हे प्रमुख भूमिकेत आहेत.

भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांनी बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही केल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही कथा एका अशा कुटुंबाची कहाणी आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमवणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येकजण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहे. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे.

या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पीयूष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरिता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -