Sunday, June 30, 2024
Homeताज्या घडामोडीThe Lady Killer Trailer: अर्जुन आणि भूमीचा 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर...

The Lady Killer Trailer: अर्जुन आणि भूमीचा ‘द लेडी किलर’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मुंबई: बॉलिवूडचा हँडसम हंक अर्जुन कपूर(arjun kapoor) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर(bhumi pednekar) गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या आगामी सिनेमा ‘द लेडी किलर’मुळे चर्चेत होते. आज रविवारी या सिनेमाच्या मेकर्सनी चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून स्पष्ट होते की हा सिनेमा चाहत्यांना मिस्ट्री आणि थ्रिलचा डोस देणार आहे.

रिलीज झाला अर्जुन कपूरचा ‘द लेडी किलर’चा ट्रेलर

द लेडी किलरचा हा ट्रेलर २ मिनिटे आणि २२ सेकंदाचा आहे. याची सुरूवात अर्जुन कपूरसोबत होते. सिनेमात अर्जुन नव्या शहरात राहण्यास जातो. येथे त्याची भेट भूमी पेडणेकरशी होते. ट्रेलरमध्ये अर्जुनचा ढांसू लूक पाहायला मिळत आहे. भूमीही अर्जुनला कडवी टक्कर देताना दिसत आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर अपलोड होताच चाहत्यांना आवडू लागला आहे.

 

या दिवशी थिएटरमध्ये रिलीज होणार सिनेमा

द लेडी किलरच्या माध्यमातून अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. तर ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. अनेक युजर्सना त्यांची ही केमिस्ट्री आवडली आहे. हा सिनेमा येत्या ३ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. थिएटर्सशिवाय अर्जुनचा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

अर्जुन आपल्या प्रोफेशनल लाईफऐवजी लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असतो. तो सध्या आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या अभिनेत्री मलायका अरोरा हिला डेट करत आहे. काही दिवसांआधी अर्जुनने तिला खास अंदाजामध्ये बर्थडे विश केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -