नाशिक : राज्यात काल अचानक अनेक टोल नाक्यांवर आयकर विभागाने छापा टाकला असून नाशिक शहरालगत असलेल्या शिंदे गावाजवळील शिंदे टोल नाक्यावर देखील आयकर विभागाने छापा टाकला असून यामध्ये दोन पथकांनी टोल नाक्यावर छापा टाकत अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती प्राप्त होत आहे.
या कारवाईदरम्यान टोल नाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल्स जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या तपासात नेमकी काय निष्पन्न झाले याबाबत गोपनीयता पाळण्यात आली असून टोल नाक्यावर होणारा भ्रष्टाचार तसेच काही अनियमितता असल्याच्या कारणावरून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला असून यातून नेमकं काय निष्पन्न झालं याबाबत माध्यमांना माहिती देण्यात आलेली नाही.