Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीड्रग्ज माफियांचा सोलापूर कारखाना उध्वस्त करत दहा कोटींचा एमडी जप्त

ड्रग्ज माफियांचा सोलापूर कारखाना उध्वस्त करत दहा कोटींचा एमडी जप्त

नाशिक पोलिसांची सोलापूरला धडक

नाशिक प्रतिनिधी: काही दिवसांपासुन राज्यभर गाजत असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील व त्याच्या नाशिक मधील अवैध एमडी निर्मिती कारखान्यातून साकीनाका पोलिसांनी धाड टाकत 300 ते 400 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. साकीनाका पोलिसांनी नाशिक मध्ये येत अवैध ड्रग्सचा कारखाना उध्वस्त करत कोट्यवधींचा अमली पदार्थ हस्तगत केल्याने सर्वच स्तरातून नाशिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत अमली पदार्थ विरोधी पथकाने शोध मोहीम राबविली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक 7/9/2023 रोजी दाखल गुन्ह्याचा तपास हाती घेतला. १२.५ ग्रॅम वजनाच्या मेफेड्रोन या अमली पदार्थासह संशयित आरोपी गणेश संजय शर्मा याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून गोविंदा संजय साबळे व अतिश उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी या दोन संशयतांकडून त्याने एमडी विकत घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. पुढे चौकशी दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयीत १)सनी अरुण पगारे वय 31 वर्ष राहणार गोसावी वाडी, पगारे चाळ, नवीन बिटको हॉस्पिटलच्या मागे, नाशिक रोड, २) अर्जुन सुरेश पीवाल, ३) मनोज भारत गांगुर्डे, ४) सुमित अरुण पगारे माफीयांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडे सखोल तपास करत असताना मनोज भारत गांगुर्डे याच्याकडून एक किलो 27 ग्रॅम सनी पगारे याच्याकडून दोन किलो 63 ग्राम तसेच अर्जुन सुरेश याच्याकडून 58 ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.

अधिक तपास केला असता तितक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळून आल्याने तसेच या संशयीतांनी कारखाना देखील सुरू केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड व त्यांच्या पथकाने सोलापूर येथे अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकत सुमारे सहा किलो 600 ग्रॅम वजनाचा तीन कोटी तीस लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह एमडी पावडर सदृश्य अमली पदार्थ 14 किलो 243 ग्रॅम वजनाचे सुमारे दोन कोटी 84 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच 30 किलो वजनाचा कच्चामाल सुमारे 60 हजार रुपये किमतीचा व अमली पदार्थ निर्मिती करिता लागणारे द्रव्य रसायन सुमारे दहा लाख रुपये किमतीचे व 25 लाख रुपयांची इतर साधने असा एकूण सात कोटी नऊ लाख 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या संपूर्ण कारवाईत नाशिक अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने सुमारे दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. असून ही अगदी दिलासादायक तसेच विचार करायला लावणारी देखील बाब असल्याचे बोलण्यात येत आहे. या प्रकरणात अवैध कारखाना निर्मितीसाठी मदत करणाऱ्या मनोहर पांडुरंग काळे व सोलापूर येथील एक इसम यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असून आत्तापर्यंत सदर गुन्ह्यात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.

बहुतांश आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून खून दरोडे अपहरण यासह अनेक गुन्हे शहर व इतर ठिकाणी त्यांच्यावर दाखल असून या प्रकरणात अजून त्यांच्याकडे चौकशी सुरू असून अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फळ धर्मराज बांगर किरण रौंदळ प्रवीण सूर्यवंशी हेमंत तोडकर व पथकातील इतर अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

कॉलिंगसाठी जंगी ॲपचा वापर
शहर भरात एमडी विक्रीचा अवैध व्यवसाय चालवण्याकरिता ड्रग्स माफियांनी नवीन कॉलिंग पद्धतीचा अवलंब केल्याने आज पर्यंत ते पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरत होते. अटक करण्यात आल्यानंतर संशयतांची सखोल तपासणी करत हा अवैध व्यवसाय चालवण्याकरिता त्यांच्या मोबाईल द्वारे कुठलेही पुरावे उपलब्ध होत नसल्याने हा व्यवसाय कसा चालू शकतो. पोलिसांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला असतानाच चौकशीत संशयतांनी VOIP इंटरनॅशनल कॉलिंग पद्धतीचा वापर केला असल्याचे समोर आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते. या ॲपद्वारे ड्रग्स माफीयाने कॉल केल्यास समोरच्या व्यक्तीला मूळ नंबर त्याच्या डिस्प्लेवर न दिसता इतरच कुठले नंबर दिसतात आणि प्रत्येक वेळेला ड्रग माफिया ज्या वेळेला कॉल करतो समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर येणारा नंबर हा वेगळा असतो. ज्याला मल्टिपल नंबर्स कॉलिंग असे देखील म्हटले जाते विशेष बाब म्हणजे या नंबर वर इन्कमिंग होत नाही आणि तो ट्रेस देखील होत नाही.

…तर पाटील किंवा पगारेचा कारखाना तेंव्हाच उध्वस्त झाला असता
ललित पाटील या ड्रग्ज माफियाच्या चौकशीतून धक्कादायक गोष्टींची उकल होत असतानाच 2021च्या आधी पासून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कारखाना सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. यापूर्वी नाशिक रोड पोलीस ठाण्यातच एमडी बाळगल्या प्रकरणी व विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता याची गंभीरतेने दखल घेत जर तपास केला असता तर कदाचित साकीनाका पोलिसांना कारवाई कारवाई करण्याची संधी मिळाली नसती.मात्र पुढे तपास का झाला नाही, कुणाची इच्छा नव्हती व पुढे हा व्यवसाय बिनदिकत वृद्धिगंध होत गेल्याची मुख्य कारणं व याला कारणीभूत कोण याबाबत देखील सखोल तपास झाल्यास काही धक्कादायक नावे नक्कीच समोर येतील. कारवाई करत एमडी हा अवैध अमली पदार्थ विकणारा व बाळगणारा याला अटक करणाऱ्या पोलीस अंमलदाराला रिवॉर्ड देण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्या विषयी खोटी माहिती पुरवून पत्रकारांचा मित्र आहे व पत्रकारांना खात्यातील गोपनीय गोष्टी सांगतो. या कारणास्तव दंगल नियंत्रण कक्षात त्याला संलग्न करण्यात आले याबाबत देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सतत पुण्याला जाणाऱ्या त्या वसुली कारकूनाची चौकशी झाल्यास धक्कादायक गोष्टींची उकल होईल आणि पैसा-दास झालेल्या मानसिकतेचा उलगडा होऊन संपूर्ण खेळ लक्षात येईल.अशी चर्चा पोलिस आयुक्तलयात सुरु आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -