नाशिक : मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भडकाऊ, भावना भडकवणारे वक्तव्य करून मराठा समाजाची माथी, भावना भडकवणारा वकील गुणरत्न सदावर्ते याला अटक करा व त्याच्याविरोधात कठोर गुन्हे नोंदवा, असे निवेदन नाशिकच्या शिवतीर्थावर सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिले. यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस आयुक्तांची परवानगी घेऊन आपणांस बोलावून गुन्हा नोंदवू असे सांगण्यात आले.
निवेदनात गुणरत्न सदावर्ते या वकिलाने सातत्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, मराठा समाजाला मी आरक्षण मिळवू देणार नाही, मराठा आर्थिक मागास नाही, घटनेनुसार मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, आंतरवेली सराटीला मराठ्यांवर लाठीमार झाला असताना बेजबाबदार विधाने केली, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दीड कोटीच्या सभेला जत्रा म्हणून मराठ्यांना हिणवले. तसेच मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी करत, भडकवणारे वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना भडकवणारा वकील गुण रत्न सदावर्ते या प्रक्षोभक विधान करणा-यावर कठोर गुन्हे नोंदवावे ही मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर नाना बच्छाव, राम खुर्दळ, चंद्रकांत बच्छाव, नितीन डांगे पाटील, प्रफुल्ल वाघ, योगेश कापसे, योगेश नाटकर, स्वातीताई कदम, ऍड शितल भोसले, संजय देशमुख, राज भामरे, विकी गायधनी, सचिन निमसे, पोपटराव भामरे, ऍड कैलास खांड बहाले, नितीन रोटे पाटील, संजय फडोल, शरद लभडे, सुधाकर चांदवडे, अनिल आहेर, संजय पांगारे, सोपान कडलंग, निलेश ठुबे, विजय चव्हाळ, ऍड गोकुळ पाटील, इत्यादींची स्वाक्षरी आहे.