Friday, June 13, 2025

Rohit pawar: रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला स्थगिती

Rohit pawar: रोहित पवारांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला स्थगिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेबद्दल महत्त्वाचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत युवा संघर्ष यात्रा स्थगितीची घोषणा केली. राज्यात तरुणांच्या आत्महत्या होत आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच युवा संघर्ष यात्रा थांबवत असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवदी काँग्रेसकडून राज्यातील तरूण तसेच नागरिकांच्या हितासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या यात्रेचा आजचा चौथा दिवस होता. मात्र चार दिवसानंतर ही यात्रा स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केला.


ज्या कारणासाठी युवा संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली होती त्या कारणांवर सरकार काहीतरी मार्ग शोधून काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या राज्यात तरूणांच्या आत्महत्या होत आहे. त्यामुळे राज्यातील हे वातावरण अस्वस्थ करणारे आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय ते आत्महत्या करत आहेत. त्यासाठी सरकारही पावले उचलताना दिसत नाही आहेत.

Comments
Add Comment