Sunday, June 1, 2025

ताज्या घडामोडीपालघर

Border Security Force : अभिमानास्पद! वाडा तालुक्यातील ममता लहांगे सीमा सुरक्षा दलात दाखल

Border Security Force : अभिमानास्पद! वाडा तालुक्यातील ममता लहांगे सीमा सुरक्षा दलात दाखल

आजपासून प्रशिक्षणाला सुरुवात


वाडा : वाडा तालुक्यातील चंद्रपाडा (कोंढले) येथील कु. ममता लहांगे हिची सीमा सुरक्षा दल (Border Security Force) मध्ये निवड झाली आहे. आजपासूनच तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये दाखल झालेली वाडा तालुक्यातील ममता ही पहिली मुलगी असल्याने तिचे प्रचंड कौतुक होत आहे. तर वाडा वासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.


ममता लहांगे हिने वाड्यातील पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई पोलिसांत निवड होऊन सुद्धा तिने सीमा सुरक्षा दल सारखं सैन्य क्षेत्र निवडलं यावरून तिच्या मनात असलेली देशभक्तीची जाणीव होत आहे.


लवकरच यशस्वी सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून ती सैन्य सेवेत दाखल होऊन वाडा तालुक्याचे तसेच पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सेवा करेल. यामुळे तिच्यावर प्रत्येक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment