Tuesday, November 12, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023PAK vs SA: विश्वचषकात पाकिस्तानचा सलग चौथा पराभव, रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेने मारली...

PAK vs SA: विश्वचषकात पाकिस्तानचा सलग चौथा पराभव, रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेने मारली बाजी

चेन्नई: विश्वचषकात धक्कादायक पराभवाचा बळी ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा(south africa) संघ विजयरथावर स्वार झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध(pakistan) विश्वचषकातील आपला सहावा सामना खेळण्यास उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाने आपली विजयी स्वारी कायम ठेवली आहे. पाकिस्तान आणि द. आफ्रिका यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली. पाकिस्तानच्या संघाने सामन्याच्या शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केला. मात्र अखेरीस आफ्रिकेने बाजी मारली.

गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेने शानदार सुरूवात केली. संघाचा स्टार पेसर मार्को यान्सनने तीन विकेट मिळवल्या. यात दोन सलामीवीरांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने ६५ बॉलमध्ये ५० धावांची खेळी केली. याशिवाय सऊद शकीलने ५३ बॉलमध्ये ५२ धावा केल्या. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. दरम्यान, शादाब खानने मोर्चा सांभाळला आणि ४३ धावांची खेळी करत स्कोर वाढवला. यामुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेसमोर २७१ धावांचे आव्हान ठेवता आले.

मार्करम ठरला संकटमोचक

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली. डीकॉक, डुसेन आणि क्लासेनसारख्या दिग्गज खेळाडूंना पाकिस्तानी गोलंदाजांनीन उशिरापर्यंत टिकू दिले नाही. एकीकडे विकेट पडत असतानाच दुसरीकडे एडन मार्करम क्रीझवर टिकून होते. यावेळी कठीण काळात टीमसाठी शानदार खेळी केली. त्याने ९३ बॉलमध्ये ९१ धावांची शानदार खेळी केली. त्याचे शतक ९ धावांनी हुकले.

४१व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानने बाजी पलटली आणि पाहता पाहता द. आफ्रिकेचे ९ विकेट पडले. या दरम्यान, शाहीन आफ्रिदी आणि हारिस शिकंजा यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र केशव महाराजने शेवटपर्यंत टिकून राहत रोमहर्षक सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. द. आफ्रिकेने या सामन्यात १ विकेटनी विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -