Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Hasan Mushrif : एका घटनेमुळे शपथ घेतली नाही, नाहीतर जयंत पाटीलदेखील आमच्याबरोबर आले असते...

Hasan Mushrif : एका घटनेमुळे शपथ घेतली नाही, नाहीतर जयंत पाटीलदेखील आमच्याबरोबर आले असते...

हसन मुश्रीफ यांचा मोठा गौप्यस्फोट


कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जून महिन्यात फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट निर्माण झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. सरकारची बाजू पटली म्हणून आम्ही सरकारला साथ देत आहोत असे अजितदादांच्या गटाकडून सांगण्यात येते तर शरद पवार गटाने मात्र विरोधी भूमिकेतच राहणे पसंत केले आहे.


राष्ट्रवादीच्या या संघर्षामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra politics) अनेक उलथापालथी झाल्या. दोन्ही गटांतील नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही सुरुच असतात. गेल्या काही दिवसांपासून तर शरद पवारांसोबत राहणे पसंत केलेले जयंत पाटील (Jayant Patil) लवकरच अजितदादांची साथ देणार अशा चर्चा सुरु आहेत. जयंत पाटलांनी हे नाकारुनही या चर्चा थांबत नाहीत. त्यातच आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.


हसन मुश्रीफ म्हणाले, “जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्यांच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतिमूल्ये पाळणारा माणूस आहे,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान केलं.


Comments
Add Comment