नवी दिल्ली: भारतात अॅपलचे आयफोन बनवण्याचे काम लवकरच टाट ग्रुपच्या हातात येणार आहे. भारतात आयफोन बनवणारी कंपनी विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग इंडियाचे अधिग्रहण टाटा ग्रुप करत आहे. या अधिग्रहणाला विस्ट्रॉन इन्फोकॉमची पॅरेंट कंपनी विस्ट्रॉन कॉर्पच्या प्रमुख मंडळाने मंजुरी दिली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर याची माहिती दिली. टाटा ग्रुप अडीच वर्षांच्या आत डोमेस्टिक आणि जागतिक स्तरावरील मार्केसाठी भारतात iPhones बनवण्यास सुरूवात करेल.
सध्या विस्ट्रॉनचे भारतातील प्लाँट आपल्या ८ प्रॉडक्शन लाईनमध्ये आयफोन १२ आणि आयफोन १४चे मॅन्युफॅक्चरिंग करत आहे. टाटाने अधिग्रहण केल्यानंतर विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारातून बाहेर होईल. कारण हे भारतात अॅपल उत्पादनांचे प्रॉडक्शन कऱणारी कंपनीचा एकमेव प्लांट आहे.
आयटी मंत्र्यांनी टाटांचे केले अभिनंदन
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी पीएलआय योजनेने आधीच भारताला स्मार्टफोन विनिर्माण आणि निर्यातीसाठी एक विश्वसनीय आणि प्रमुख केंद्र बनवण्यासाठी प्रेरित केले आहे. आता अडीच वर्षाच्या आत भारतात आयफोन बनण्यास सुरूवात होईल.