Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीदिवंगत पोलिस नाईक वाटाणे यांच्या कुटुंबियांना एक कोटी तेरा लाखांचे विमा सहाय्य

दिवंगत पोलिस नाईक वाटाणे यांच्या कुटुंबियांना एक कोटी तेरा लाखांचे विमा सहाय्य

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

नाशिक (प्रतिनिधी) – कै.पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि कार्यरत असताना दिनांक ०८/०७/२०२३ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.

पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी यांच्या सॅलरी खात्यावर अक्सिस बँके कडुन अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १,०५,००,०००/- रुपये देण्यात येतात.अक्सिस बँकेतर्फे मयत कै. पोलीस नाईक सचिन वाटाणे यांच्या वरसदाराला १,०५,००,०००/-रुपये आणि अक्सिस बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी ८,००,०००/-रुपये देखील देण्यात आले .

एकूण एक कोटी तेरा लाख रूपये

विमा रक्कमेचा धनादेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते त्यांचे वारसदार श्वेता सचिन वाटाणे यांना देण्यात आला.या वेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे आणि अक्सिस बँकेचे क्लस्टर हेड दिनेश निचीत,गंगापूर रोडच्या शाखाप्रमुख राजश्री उदावंत आनंदवल्ली शाखेचे शाखाप्रमुख संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -