Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

Jammu Kashmir: अर्नियामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर सुरू होता गोळीबार

Jammu Kashmir: अर्नियामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर सुरू होता गोळीबार

श्रीनगर: पाकिस्तानने(pakistan) जम्मू-काश्मीरच्या जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा नापाक कारवाई केली. गुरवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानी सैन्याकडून बीएसएफवर निशाणा साधताना जोरदार गोळीबार केला. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामुळे सीमेजवळील गावात राहणाऱ्या लोकांना बंकरमध्ये रहावे लागले.


हा गोळीबार गुरूवारी रात्रीपासून सुरू आहे आणि सीमेवर गोळीबाराचा आवाज सरु होता. अर्णिया सेक्टरमधील गावातील नागरिकांनी सांगितले की, गोळीबार रात्रभर सुरू आहे. आमच्या गावापासून बॉर्डर दीड किमी अंतरावर आहे. असे २-३ वर्षानंतर होत आहे. संपूर्ण गावातील नागरिक बंकरमध्ये आहेत. कोणालाच माहीत नाही अखेर काय होणार आहे.


अर्णिया सेक्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, गोळीबार काल रात्री ८ वाजल्यापासून सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदार गोळीबार केला जात आहे. असे साधारण ४-५ वर्षांनी झाले. प्रत्येकजण आपल्या घरात आहेत. आमच्या गावात लग्न सुर होते. तेव्हा सर्व लोक तेथे आले होते. जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की ते जिथे आहेत तिथेच थांबावे. सगळेजण आपल्या घरात लपले आहेत.



गोळीबाराला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर


पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानकडून अचानक गोळीबार का केला जात आहे याची माहिती मिळालेली नाही. या गोळीबारात जिवितहानी झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Comments
Add Comment