दिल्ली: ऑस्ट्रेलियाने दिल्लीत खेळवल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँडसला ३०९ धावांनी हरवले. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने शानदार कामगिरी करत शतक ठोकले. मात्र मॅक्सवेल सामन्यानंतर नाराज दिसला. त्याने अरूण जेटली स्टेडियममध्ये आयोजित लाईट शोबाबत नाराजी व्यक्त केली.
मॅक्सवेलने म्हटले की हे क्रिकेटर्ससाठी खूप भयानक आहे. चाहत्यांसाठी हा शो चांगला असू शकतो. मात्र क्रिकेटर्ससाठी नाही. यावर डेविड वॉर्नरनेही प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नरने मात्र बचाव केला आहे. मॅक्सवेलचे म्हणणे आहे की लाईट शोमुळे त्याला खूप त्रास झाला.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार , मॅक्सवेलने सांगितले की या लाईटशोमुळे डोकेदुखी झाली. डोळ्यांना अॅडजस्त करण्यास वेळ लागला होता. मला वाटते की क्रिकेटर्ससाठी हे मूर्खपणाचे होते. मी सामन्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र हे खूप भयानक होते. चाहत्यांसाठी हे चांगले आहे. मात्र क्रिकेटर्ससाठी नाही.
I absolutely loved the light show, what an atmosphere. It’s all about the fans. Without you all we won’t be able to do what we love. 🙏🙏🙏 https://t.co/ywKVn5d5gc
— David Warner (@davidwarner31) October 25, 2023
मॅक्सवेलच्या विधानानुसार डेविड वॉर्नरने यावर प्रतिक्रिया दिली. तो बचाव करताना म्हणाला, मला लाईट शो खूप पसंद केला. काय वातावरण होते. सगळं काही चाहत्यांसाठी होते. तुमच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही.
मॅक्सवेलने दिल्लीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्याने ४० बॉलमध्ये शतक ठोकले. मॅक्सवेलने ४४ बॉलचा सामना करताना १०६ धावा केल्या. या दरम्यान त्याने ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले. मॅक्सवेलसह डेविड वॉर्नरनेही शतक ठोकले. त्याने ९३ बॉलमध्ये १०४ धावा केल्या.