Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

Encounter: पाकिस्तानी सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले मोठे यश

Encounter: पाकिस्तानी सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले मोठे यश

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या माछिल सेक्टरमध्ये गुरूवारी सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांकडून केला जाणारा घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. एलओसीवर सुरक्षा रक्षकांनी मोठ्या ऑपरेशनमध्ये लष्कर ए तोयबाच्या ५ दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार या भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.


जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी माछिल सेक्टरमध्ये पोलिसांच्या एका विशेष इनपुटच्या आधारावर लष्करासोबत मिळून संयुक्त अभियान सुरू केला होते. सूत्रांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवाद्यांचा एक गट या भागात धुसखोरी करण्याचा प्रयत्न कऱणार असल्याची सूचना दिली होती.



सहा तासांच्या दीर्घकाळ ऑपरेशनंतर आणखी ३ दहशतवादी ठार


घुसखोरी कऱणाऱ्या दहशतवाद्यांच्यागटाला सीमेजवळ सतर्क सैनिकांकडून ट्रॅक करण्यात आले आणि आव्हान दिले. या दहशतवाद्यांना जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात सुरूवातीला दोन दहशतवादी मारले गेले तर इतरांनी या भागाचा फायदा उचलला. अखेर ६ तासांच्या दीर्घ ऑपरेशननंतर आणखी ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.



मारण्यात आलेल्या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटवतेय पोलीस


जम्मू-काश्मी पोलिसांनी सोशल मीडिया एक्सवर माहिती देताना म्हटले की लष्कर ए तोयबाचे तीन आणखी दहशतवादी मारले गेले.यांची संख्या एकूण ५ झाली आहे. या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment