- समर्थ कृपा : विलास खानोलकर
मुंबईच्या जगन्नाथराव शिरोडकरांच्या पायाची व्याधी फारच विकोपास गेली होती. त्या वेळच्या कोणत्याही वैद्य वा डॉक्टरांच्या औषधांचा गुण येईना. पाय ढोपरापासून कापावे लागतील, तसे डॉक्टरांचे मत पडले. यावरून त्यांच्या पायाच्या व्याधीची कल्पना येते. पण ‘अशक्यही शक्य करतील श्री स्वामी’ याची प्रचिती आलेल्या मित्राच्या सांगण्यानुसार जगन्नाथराव अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. श्री स्वामींचे तेजस्वी रूप पाहताच त्यांची खात्री झाली की, श्री स्वामी आपला रोग निश्चित बरा करतील.
“महाराज एक तर हे पाय बरे करून मला जीवदान द्या अथवा मारून तरी टाका.” त्यांच्या या निर्वाणीच्या प्रार्थनेने श्री स्वामी कळवळले. त्या जखमांकडे ज्ञानदृष्टीने पाहत सद्गुरू श्री स्वामी समर्थ म्हणाले, “क्या दर्द है? फेक दो भानच्योदकू” त्या सरशी त्यास थोडे बरे वाटू लागले. सोबत आलेली त्यांची पत्नी सारखी रडत होती. श्री स्वामी चरणी मस्तक ठेवून तिने त्यांच्याकडे चुडेदान मागितले. त्यांनी त्यास होकारार्थी मान हलवून मूक सम्मती दिली. यातच सर्व काही आले. प्रारब्धातले भोग हे भोगून संपवावे लागतात, ते खरेच. आता ते दोघेही पती-पत्नी श्री स्वामी समर्थ चरणाशी येऊन सेवा रुजू करीत होते. त्यामुळे वेदनेची प्रारंभीची तीव्रता कमी झाला.
प्रारब्ध इतके तीव्र होते की, उपचार करून जगन्नाथराव कंटाळले. “हे माझ्या कपाळीचे (नशिबातले) भोग कधी सरणार आहेत कुणास ठाऊक?” असा कमालीचा उद्वेग त्यांच्या मनात आल्याचे सद्गुरू श्री स्वामींनी जाणले व त्यास दिलासा देत ते म्हणतात, “नवे औषध तयार होत आहे.” हे नवे औषध दुसरे तिसरे कोणतेही नसून सद्गुरू श्री स्वामींची कृपादृष्टी. येथे कुणासही एक गोष्ट लक्षात येईल ही ‘श्री सद्गुरूंची सेवा.’ दुःख-संकट-व्याधी-पीडा यात दिलासा देते. श्री स्वामींचे चरणतीर्थ मनोभावे घेण्याचा जगन्नाथरावांचा नित्य उपक्रम सुरूच होता. “सोसवत नाही, मला या दुःखापासून सोडवा.” असे जेव्हा ते मोगलाईतील नरगुंद येथे श्री स्वामीस सांगतात तेव्हा ते “मालक आला नाही” असे सूचकपणे त्यास सांगतात. पण जगन्नाथरावांच्या दृष्टीने श्री स्वामी हेच मालक-चालक-पालक. ते खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री समर्थ चरणास लावून परत खिशात ठेवतात. ‘या पादुकांच्या (श्री समर्थांच्या) तीर्थाशिवाय अन्य औषध आता फलश्रुती म्हणून त्यांचे पाय यथावकाश बरे होतात. ढोपरांपासून पाय कापण्याचा सल्ला त्यांना दिला गेला होता. पण आता सर्वांनाच श्री स्वामी लीलेचे मोठे आश्चर्य वाटते. केवळ सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या सहवासाने, सेवेने त्यांच्या चरणतीर्थ किती मोठा परिणाम होतो, हे या लीलेवरून प्रबोधित होते.’
समर्थ दिव्य चालिसा
(स्वामी म्हणती) नको घेऊ
तू शंका
साऱ्या जगभर माझाच रे डंका ॥१॥
शत्रूची जरी मोठी लंका
मज स्पर्शाने श्रीरामची श्रीलंका॥२॥
होती रावणाची सोन्याची लंका
हनुमान शेपटीने केली जळकी लंका॥३॥
वृथा नको ठेवू उगाच गर्व
मी जाणतो आतबाहेर सर्व॥४॥
तुझ्या झुट गर्वाचा दर्प
तुलाच डसेल तुझाच सर्प॥५॥
माझ्या पायातली तुला रे मुक्ती
कर माझी काम करतानाच भक्ती॥६॥
नाही माझी काही सक्ती
तुझ्या चांगुलपणामागे माझी ती शक्ती॥७॥
नको उगाच तू रे भिऊ
राक्षसाला सुद्धा लागेन मी खाऊ॥८॥
भूत पिशाच्च सारे होतील मऊ
दत्तगुरू सारे माझे भाऊ॥९॥
ब्रह्मा विष्णु महेश
सारे माझेच ते नरेश॥१०॥
सिंधू सिंधुतला मी आहे हिंदू
जगनिमार्त्याला आपण सारे वंदू॥११॥
कधी श्रीकृष्णाचा मी बलराम
पार्थ अर्जुनाचे करतो सारे काम॥१२॥
दिवसरात्र करा तुम्ही काम
दिन रात्र गाळा तुम्ही घाम॥१३॥
पण पहाटे पहाटे घ्या माझेच नाम
नामातच लपला माझा श्रीराम॥१४॥
श्रीराम नामाचे तरंगले दगड
लंकासेतू बांधला हनुमान फक्कड॥१५॥
छोटी खार सुद्धा मदतीला फक्कड
नरवानर, बांधला सेतु नुक्कड॥१६॥
तेथे होती रामनामाची जादू
रावणाची लंका हालली गदगदू॥१७॥
वाळू किनारी शंकराची पिंडी
रामसुद्धा पूजा करी जग दिंडी॥१८॥
शंख फुकूनी पिटवीली दवंडी
जाभुवंत नलअगंद बांधली तिरडी॥१९॥
राम बाण लागुनी रावण उतरंडी
नरकाला गेला रावण पाखंडी॥२०॥
श्री रामसेवेने रोज दिवाळी दसरा
आयुष्याचा प्रत्येक दिवस होईल हसरा॥२१॥
नको करू कोणताच नखरा
राम नामाने दूर होईल रोग दुखरा॥२२॥
जळी स्थळी काष्ठी
सर्वत्र चालती माझ्याच गोष्टी॥२३॥
श्रीराम कबीराचा मी होतो कोष्टी
श्रीकृष्णालाही वासुदेव सांगे गोष्टी॥२४॥
उत्तमते जिंकवण्यासाठी मी पराकाष्टी
दुःख, पराभव, जाई समष्टी॥२५॥
मी उडवतो यमाच्याही यष्टी
अष्टीमीला फोडतो मी सुखाची हंडी॥२६॥
श्रीकृष्णा बरोबर खेळातो मी दहीहंडी
दुशासनाची मी फोडतो मांडी॥२७॥
दुर्योधनाची मी करतो गचांडी
शकुनी मामालाही लावतो उतरंडी॥२८॥
कंसमामाची फोडतो मी नरडी
दौपदीची फुलांनी भरतो परडी॥२९॥
वाटतो मी सांब शिवशंकर
वाटे भोळा साधा शंकर॥३०॥
तपस्या केली मी भयंकर
देतो कानाखाली एकच भयंकर॥३१॥
डमरूसह नृत्य तांडव
नाचती सारे यक्ष दक्ष तांडव ॥३२॥
पार्वतीच्या लग्नाला स्मशानात मांडव
त्रिलोक हाले करता तांडव ॥३३॥
स्वामींचा उघडा सदैव तिसरा डोळा
आशीर्वाद घेण्यास भक्त गोळा॥३४॥
करा रोज नाम जप सोळा
पुण्य करा हो सारे गोळा॥३५॥
स्वर्गात नेणार नाही रुपये सोळा
शरीराचा होणार पालापाचोळा॥३६॥
आई-वडील, आजी-आजोबा
होती गोळा
आशीर्वाद घेऊनी द्या पुरणपोळ्या॥३७॥
सारे खाली हात आले
पुण्य केले तेच स्वर्गात गेले॥३८॥
राम नाम स्वामीनाम घेत गेले
स्वामी नामानेच संकटात तरले॥३९॥
स्वामी चालिसा पुरी करत आले
अमर विलास पहाटेचे चार वाजत आले॥४०॥