बंगळुरू: विश्वचषकात आज २५वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंकेचे संघ आमनेसामने असतील. पॉईंट्सटेबलमध्ये या दोन्ही संघाची स्थिती खराब आहे. श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानावर आहे तर इंग्लंडचा संघ आठव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत ४-४ सामने खेळले आहेत. मात्र केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला. आता हे पाहावे लागेल की कोणता संघ आजच्या सामन्यात बाजी मारतो.
इंग्लंडची स्थिती
इंग्लंड या वनडे आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटमध्ये गतविजेता आहे. त्यांचा खेळण्याची स्टाईल वेगळीच आहे. याच कारणामुळे विश्वचषक सुरू होण्याआधीच इंग्लंडला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र विश्वचषक सुरू होताच चित्र काही वेगळेच पाहायला मिळाले. इंग्लंडची कामगिरी साधारण राहिली. इंग्लंडला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला. मात्र अफगाणिस्तान आणि द आफ्रिकेच्या हातून त्यांचा पराभव झाल्याने सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग कठीण दिसत आहे.
श्रीलंकेची स्थिती
श्रीलंकेच्या संघाने गेल्या काही महिन्यांत चांगले क्रिकेट खेळले होते. आशिया चषकातही त्यांनी फायनलपर्यंत मजल मारली होती. या विश्वचषकात त्यांची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांनी आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकलेला आहे. तर ३ सामन्यात पराभव झाला.
इंग्लंडचे प्लेईंग इलेव्हन
डेविड मालन, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक/लियाम लिविंगस्टोन, जोस बटलर (कप्तान आणि विकेटकीपर), डेविड विली/मोईन अली, क्रिस वोक्स/सैम कुरेन, आदिल राशिद, गस एटकिंसन, मार्क वुड
श्रीलंकेचे प्लेईंग इलेव्हन
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चैरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, एंजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा/डुनिथ वेलालेज, महीश थीक्षाना, कासुन राजिथा, दिलशान मदुशंका