Tuesday, October 8, 2024
Homeदेशएनसीईआरटीच्या पुस्तकात आता 'इंडिया' ऐवजी 'भारत'!

एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’!

नवी दिल्ली : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटीच्या पुस्तकातून ‘इंडिया’ शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी ‘भारत’ शब्द येणार आहे.

एनसीईआरटीने त्यांच्या अभ्यासक्रमातून, पाठ्यपुस्तकातून ‘इंडिया’ शब्द हटवून त्याजागी ‘भारत’ शब्द घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात संबंधित संस्थेकडून जी पुस्तके येतील त्यात इंडियाऐवजी भारत हा उल्लेख असेल, अशी माहिती त्या पॅनलमधील एका सदस्याने दिली आहे.

नाव बदलण्याच्या मागणीचे निवेदन हे गेल्या काही महिन्यांपूर्वी केली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. संस्थेकडून इंडिया हे नाव वगळून भारत हा शब्द वापरण्यात येईल का याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यावरुन सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांकडून अनेक मतमतांतरं समोर आली होती. जी-२०च्या वेळेस देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा न करता प्रेसिडेंट ऑफ भारत असा केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -