नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्याप्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कायम आहे. यातच भारताने कॅनडाच्या लोकांसाठी व्हिसा सर्व्हिस पुन्हा बुधवारपासून सुरू केली आहे.
कॅनडाच्या ओटावामधील भारताच्या उच्चायोगाने सोशल मीडिया एक्सवर सांगितले व्हिसा सर्व्हिस- प्रवेश व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आणि कॉन्फ्रेन्स व्हिसा च्या श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला आहे.
उच्चायोगाने सांगितले की सुरक्षा लक्षात गेता अस्थायीपणे व्हिसा देण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. अशातच सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर व्हिसा सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
The latest Press Release on resumption of visa service may be seen here. @MEAIndia @IndianDiplomacy @PIB_India @DDNewslive @ANI @WIONews @TOIIndiaNews @htTweets @cgivancouver @IndiainToronto pic.twitter.com/iwKIgF2qin
— India in Canada (@HCI_Ottawa) October 25, 2023
कॅनडा आणि भारत यांच्यात वाद
नुकताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की निज्जर हत्या प्रकरणात भारतीय एजंटचा हात असू शकतो. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की हे सर्व आरोप राजकीय प्रेरणेने करण्यात आले आहेत.