दिल्ली: ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०२३मधील २४व्या सामन्यात नेदरलँड्सवर ३०९ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने बुधवाीरी दमदार कामगिरी करताना एकतर्फी विजय मिळवला. नेदरलँड्सचा संघ सुरूवातीच्या काही षटकांपासून सामन्यातून बाहेर जात होती. ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेलने रेकॉर्डतोड शतक ठोकले. यामुळे नेदरलँड्सचे काम खूपच कठीण झाले.
याआधी सलामीवीर डेविड वॉर्नरने शतक ठोकले. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी केली. संघासाठी बॉलिंगमध्ये अॅडम झाम्पा आणि मिचेल मार्शने कमाल केली.
ग्लेन मॅक्सवेलचे झंझावाती शतक
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅक्सवेलची खेळी नेदरलँडसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नाही. मॅक्सवेलने ४४ चेंडूचा सामना करताना १०६ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले. मॅक्सवेलने दिल्लीमध्ये तुफानी बॅटिंग करताना विश्वचषचकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने ४० बॉलमध्ये शतक पूर्ण केले होते.
डेविड वॉर्नरसोबत स्मिथची महत्त्वपूर्ण खेळी
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना वॉर्नरनेही शतक ठोकले. त्याने सलामीवीर ९३ बॉलमध्ये १०४ धावा ठोकल्या. यात डावात त्याने ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. स्टीव्ह स्मिथने ७१ धावांची खेळी केली. त्याने ६८ बॉलमध्ये ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. लाबुशेनने ६२ धावा केल्या. पॅट कमिन्स १२ बनून नाबाद राहिला. मिचेल मार्श ९ धावा करून बाद झाला.