मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्यात जबरदस्त धावांचा पाऊस पाहायला मिळाला. द. आफ्रिकेने बांगलादेशचा तब्बल १४९ धावांनी पराभव केला. द. आफ्रिकेने बांगलादेशसमोर विजयासाठी ३८३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र बांगलादेशचा संपूर्ण संघ ४६.४ षटकांत २३३ धावांवर आटोपला.
या विजयासह द. आफ्रिकेने सेमीफायनलसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. आता द. आफ्रिका पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. द. आफ्रिकेचे ५ सामन्यात ८ पॉईंट्स आहेत.
आफ्रिकेच्या धक्क्याने न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर होता तर आफ्रिका तिसऱ्या स्थानावर होती. मात्र आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. या पराभवासह बांगलादेशचा संघ सेमीफायनलमधून बाहेर गेला आहे.
आफ्रिकेने दिलेले ३८३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा संघ पहिल्यापासूनच डळमळीत होता. सुरूवातीला बांगलादेशने ३१ धावांत ३ विकेट गमावले. त्यानंतर ८१ धावांपर्यंत त्यांनी ६ विकेट गमावल्या. यानंतर महमदुल्लाहने डाव सांभाळला आणि नसुम अहमदसोबत त्याने ४१ धावांची भागीदारी केली.
त्यानंतर महमुदुल्लाहने मुस्तफिजुर रेहमानसोबत ९व्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवापासून वाचवले. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. यानंतर बांगलादेशचा संपूर्ण संघ २३३ धावांवर बाद झाला.