Tuesday, July 16, 2024
HomeदेशDassehra: 'आम्ही श्रीरामाची मर्यादाही जाणतो आणि आपल्या सीमांचे रक्षण करणेही' - पीएम...

Dassehra: ‘आम्ही श्रीरामाची मर्यादाही जाणतो आणि आपल्या सीमांचे रक्षण करणेही’ – पीएम मोदी

द्वारका: देशाच्या विविध भागांमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने रावणदहन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या द्वारका येथे रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी तेथील लोकांना त्यांनी संबोधित केले.

दिल्लीच्या द्वारकामध्ये दसरा कार्यक्रमात बोलताना पीएम मोदी म्हणाले, हे संकल्पांचे पर्व आहे. विजयादशमी म्हणजे आवेशावर धैर्याचा विजय, अत्याचारी रावणावर भगवान श्रीरामाच्या विजयाचा पर्व आहे. आम्ही या भावनेसह दरवर्षी रावणदहन करतो., मात्र केवळच इतकेच नाही तर हे पर्व संकल्पांचे पर्व आहे. आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचे पर्व आहे. चंद्रावरील विजयाला दोन महिने पूर्ण झाले आहेत त्यावेळेस आपण विजयादशमी साजरी करत आहोत. या दिवशी शस्त्राची पुजा केली जाते.

पंतप्रधान पुढे म्हणाले, आम्ही श्रीरामाची मर्यादाही जाणतो आणि आपल्या सीमांचे रक्षण करणेही जाणतो. आम्ही शक्ती पुजेचा संकल्प जाणतो. आज भारताने चंद्रावर विजय मिळवला आहे. तसेच त्यांनी यावेळी दावाही केला की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे. रावणाचे दहन म्हणजे केवळ रावणाचे दहन नसते तर हे दहन त्या शक्तींचे असते जे जातीयवाद आणि क्षेत्रवादाच्या नावावर धरती मातेचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी पंतप्रधान मोदींनी १० संकल्प करण्यास सांगितले

येणारी पिढी लक्षात घेता पाण्याची बचत करणे
डिजीटल देवाण-घेवाणीसाठी लोकांना प्रेरणा देणे
गाव आणि शहर स्वच्छतेमध्ये सगळ्यात पुढे
जास्तीत जास्त वोकल फॉर लोकलला फॉलो करणे
क्वालिटी काम करणे
आधी संपूर्ण देश बघणार. नंतर वेळ मिळाल्यास परदेशी फिरणार.
नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार.
धान्यांचा समावेश रोजच्या जेवणात करणार.
योगा, स्पोर्ट्सला प्राथमिकता देणार.
कमीत एका गरीब कुटुंबाचे सदस्य बनून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर वाढवणे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -