
रियाध: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील आर्थिक विकासाला मोठा झटका बसू शकतो असा इशारा वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी दिला आहे. सौदी अरेबियातील एका गुंतवणुकीतील संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात बोलताना अजय बंगा म्हणाले, नुकताच इस्त्रायल आण गाझामध्ये काय झाले. दिवसाच्या शेवटची सगळं काही एकत्र येतं. मला वाटते याचा आर्थिक विकासावरील प्रभाव आणखीही गंभीर आहे.
ते पुढे म्हणाले, मला वाटते की आपण खूप धोकादायक वळणावर आहोत. जागतिक नेत्यांना भीती आहे की हे युद्ध मध्य पूर्वेमध्ये व्यापक संघर्षाचे रूप घेऊ शकतो. युद्धाने आधीच इस्त्रायलच्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम केला आहे. यामुळे बँक ऑफ इस्त्रायलला विकास पूर्वानुमानध्ये कपात करावी लागली.
वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणाले, भू-राजकीय तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे. आर्थिक जोखीम वेगाने वाढत आहे आणि याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. त्यांनी आपली गोष्ट स्पष्ट करण्यासाठी संयुक्त राज्य अमेरिकेच्या उदाहरणाचा वापर केला.