Animal Movie : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकला 'अ‍ॅनिमल'चा टीझर

'अ‍ॅनिमल'ची जगभरात हवा...


न्यूयॉर्क : बॉलिवूडचा स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा नवा चित्रपट 'अ‍ॅनिमल'ची (Animal) सध्या चांगलीच हवा आहे. यातील अ‍ॅक्शन सीन्स, सनी देओलचा (Sunny Deol) नवा लूक आणि विशेष बाब म्हणजे साऊथ टॉप क्लास अभिनेत्री आणि रणबीर कपूर पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. त्यात आता या सिनेमाचा टीझर न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये (Times square) दाखवण्यात आला, त्यामुळे जगभरातील चाहत्यांना या चित्रपटाची भुरळ पडली आहे.


'अ‍ॅनिमल'चा हा टीझर जेव्हा न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी न्यूयॉर्कमधील लोक आणि पर्यटकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे हा चित्रपट आता जगभर गाजणार यात शंका नाही.


अ‍ॅनिमल चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्येच रिलीज होणार होता. त्यानंतर ही रिलीजची तारीख बदलून आता तो १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले. ‘अ‍ॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या