Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीAnimal Movie : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकला 'अ‍ॅनिमल'चा टीझर

Animal Movie : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकला ‘अ‍ॅनिमल’चा टीझर

‘अ‍ॅनिमल’ची जगभरात हवा…

न्यूयॉर्क : बॉलिवूडचा स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा नवा चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ची (Animal) सध्या चांगलीच हवा आहे. यातील अ‍ॅक्शन सीन्स, सनी देओलचा (Sunny Deol) नवा लूक आणि विशेष बाब म्हणजे साऊथ टॉप क्लास अभिनेत्री आणि रणबीर कपूर पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. त्यात आता या सिनेमाचा टीझर न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये (Times square) दाखवण्यात आला, त्यामुळे जगभरातील चाहत्यांना या चित्रपटाची भुरळ पडली आहे.

‘अ‍ॅनिमल’चा हा टीझर जेव्हा न्यूयॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी न्यूयॉर्कमधील लोक आणि पर्यटकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे हा चित्रपट आता जगभर गाजणार यात शंका नाही.

अ‍ॅनिमल चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्येच रिलीज होणार होता. त्यानंतर ही रिलीजची तारीख बदलून आता तो १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले. ‘अ‍ॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -