चेन्नई: विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. या संघाने याआधी गतविजेता इंग्लंडला हरवत धक्कादायक निकालाची नोंद केली. आता पाकिस्तानला हरवत सगळ्यांनाच हैराण केले. या विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ पॉईंट्सटेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
आता अफगाणिस्तानचे अंक ५ सामन्यांत ४ झाले आहे. अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानला हरवले. तर बांगलादेश, भारत आणि न्यूझीलंडकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी केले जोरदार सेलिब्रेशन
पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. याशिवाय अफगाणचे चाहतेही खूप आनंदात होते. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत अफगाणिस्तानचे खेळाडू जल्लोष करताना दिसत आहेत. भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने रशीद खानसह सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Irfan Pathan dancing with Rashid Khan.
– Video of the day from Chepauk…!!!pic.twitter.com/ijoMGqKht1
— Johns. (@CricCrazyJohns) October 23, 2023
पाकिस्तानी संघाचा सलग तिसरा पराभव
बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाला या विश्वचषकात सलग तिसरा पराभव झाला. पाकिस्तानच्या संघाने विश्वचषकातील आपली सुरूवात दमदार केली. या संघाने आधी नेदरलँड्सला हरवले. त्यानंतर श्रीलंकेला हरवले. मात्र त्यानंतर आपला विजयरथ कायम ठेवू शकले नाहीत. भारताशिवाय त्यांना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने हरवले. आता पाकिस्तानचे ५ सामन्यात ४ पॉईंट्स आहेत. ते पाचव्या स्थानावर आहेत.