Tuesday, February 18, 2025
Homeताज्या घडामोडीNPS: रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग, दर महिन्याला मिळतील १...

NPS: रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग, दर महिन्याला मिळतील १ लाख रूपये

मुंबई: रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च मॅनेज करणे कठीण होते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील.

केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची सुरूवात केली आहे. या योजनेनुसार तुम्ही एका महिन्याला एक लाख रूपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. यात सरकारी कर्मचाऱ्यापासून ते खासगी कर्मचारी कोणीही गुंतवणूक करू शकतात. एनपीएसच्या अंतर्गत १८ ते ७० वर्षांचे नागरिक गुंतवणूक करू शकतात.

रिटायरमेंटचा चांगला पर्याय

रिटायरमेंटचे वय जवळ आल्यावर लोक गुंतवणुकीसाठी त्रस्त होतात. तसेच ही गुंतवणूक कुठे करावी याबाबत विचार करू लागतात. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ७० वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. दरम्यान, तुम्हाला जितके लवकर शक्य असेल तितके लवकर गुंतवणूक सुरू करू शकता. तितकेच फायदेही अधिक होतात. नॅशनल पेन्शन स्कीम १ जानेवारी २००४मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली होती.

एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक

जर तुम्ही दर महिन्याला १० हजार रूपये ३० वर्षांपर्यंत गुंतवाल तर महिन्याला १ लाख रूपये पेन्शन मिळू शकते. तर रिटायरमेंटला १ कोटी रूपये एकरकमी मिळू शकतात. या योजनेत इक्विटी एक्सपोजर ५० ते ७५ टक्के आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -