Wednesday, July 3, 2024
Homeमहत्वाची बातमीIsrael Hamas War : इस्त्रायल-हमास यु्द्धादरम्यान हमासकडून आणखी दोघांची सुटका

Israel Hamas War : इस्त्रायल-हमास यु्द्धादरम्यान हमासकडून आणखी दोघांची सुटका

तेल अवीव: इस्त्रायलविरुद्ध(israel) युद्ध लढत असलेल्या दहशतवादी संघटनना हमासने(hamas) सोमवारी सांगितले की त्यांनी आणखी दोन जणांना सोडले आहे. दोन्ही महिला आहे. ७ ऑक्टोबरला हल्ला केल्यानंतर त्यांना इतर लोकांसोबत बंदी करण्यात आले होते.

न्यूज एजन्सी एएफपीनुसार हमासने सांगितले की त्यांनी कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीमुळे मानवीय कारणामुळे दोघांची सुटका केली आहे. याआधी हमासने अमेरिकन आई-मुलीची सुटका केली होती. आता हमासकडून सुटका करण्यात आलेल्या दोन महिलांबाबत इस्त्रायलकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.

इस्त्रायलने म्हटले होते की गाझामध्ये २२२ जणांना बंदी करण्यात आले आहे यात दोन महिलांना शुक्रवारी २० ऑक्टोबरला सोडण्यात आले. अलजजिराच्या रिपोर्टनुसार हमासचे एक प्रवक्ता ओसामा हमदान यांच्या माहितीनुसार इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी या बंदीवानांना सोडले जाण्याबाबतची गोष्ट स्वीकारली नाही. आता स्वीकारली आहे. हमासच्या प्रवक्त्यांनी सांगितले, त्यांना सोडण्याबद्दल आम्हाला काही मिळाले नाही आम्ही मानवीय पैलूवर त्यांना सोडले आहे.

इस्त्रायलने कराराचे पालन केले नाही – हमास

हमासच्या प्रवक्त्याने इस्त्रायलवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. ओसामा हमदान म्हणाले, आम्ही त्यांना सोडण्यासाठी कमीत कमी काही वेळेसाठी गाझावर बॉम्बहल्ला बंद करणे, रेड क्रॉसजवळ पाठवणे आणि त्यानंतर अधिकाऱ्यांकडे पाठवण्यास सांगितले होते. इस्त्रायलने त्याचे पालन केले नाही. यावरून समजते की इस्त्रायलवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार हमासच्या मिलिट्री विंग कासिम बिग्रेडने आपल्या टेलीग्राम चॅनेलच्या माध्यमातून दोन आणखी बंदीवानांची सुटका केल्ययाची घोषणा केली. यांचे नाव नुरिट यित्जाक आणि योचेवेद लिफशिट्ज आहे. याआधी अमेरिकन आई जुडिथ रानन आणि त्यांची मुलगी नताली यांची सुटका करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -